दिवाळी सणाच्या तोंडावर महावितरणकडून वीजदरवाढीची घोषणा

दिवाळी सणाच्या तोंडावर महावितरणकडून वीजदरवाढीची घोषणा करण्यात आलीय. यामुळे ऐन सणासुदीत वीज ग्राहकांना महावितरणने शॉक दिलाय. आता वीजबिलात इंधन समायोजन शुल्क लादण्यात आलं आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनित ३५ ते ९५ पैसे इतकी वाढ होणार आहे.दिवाळीच्या तोंडावरच महावितरणने घेतलेल्या या निर्णयामुळे वीज ग्राहकांना वाढीव बिल भरण्याची वेळ येणार आहे.

महावितरणने १ ऑक्टोबरला सर्क्युलर जारी करत सप्टेंबरमधील वीज वापरात इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिलेत. पुढील आदेश येईपर्यंत ही दरवाढ लागू राहणार आहे. यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. महावितरणच्या निर्णयामुळे एखाद्याचा वीज वापर १०० युनिट असेल तर त्याच्या बिलात ३५ रुपये अतिरिक्त आकारले जातील.

महावितरण १ ते १०० युनिटपर्यंतच्या वापरावर प्रति युनिट ३५ पैसे अतिरिक्त आकारणार आहे. तर ५०० युनिटपेक्षा अधिक वापरावर प्रति युनिट ९५ पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. वीजेची मागणी वाढली आहे, यामुळे ओपन मार्केटमधून वाढीव दराने वीज खरेदी करावी लागतेय. याशिवाय अधिक उत्पादन खर्च असणाऱ्या युनिटचा वापर करावा लागला असं महावितरणकडून सांगण्यात आलंय.

कसे असतील नवे दर?

१ ते १०० युनिट वीज वापर – प्रति युनिट ३५ पैसे जादा आकारणी

१०१ ते ३०० युनिट वीज वापर – प्रति युनिट ६५ पैसे जादा आकारणी

३०१ ते ५०० युनिट वीज वापर – प्रति युनिट ८५ पैसे जादा आकारणी

५०१ पेक्षा जास्त युनिट वीज वापर – प्रति युनिट ९५ पैसे जादा आकारणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button