
गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती…
गणेशोत्सव काळात शहरातील मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थिगितीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले.त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत.
गणेशोत्सव काळात खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. या निर्णयाला शहरातील बार ॲण्ड रेस्टॉरंट चालक संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.