
खोपोली शहरात भटक्या श्वानांची प्रचंड दहशत
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खोपोली शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून दहशत निर्माण झालेली आहे. शहरातील विविध भागांमध्ये लहान मुलांवर भटक्या श्वानांद्वारे हल्ला करून चावा घेतला जात आहे, त्यामुळे लहान मुलांचे रस्त्यावर फिरणे अवघड झालेले असून शहरात नागरिक दहशतीखाली आहेत.
सुप्रीम कोर्टाने भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करून त्यांना अँटी रेबीज इंजेक्शन देण्यात यावे असा निकाल दिला असताना खोपोली शहरात नागरिकांतर्फे प्रचंड प्रमाणात भटक्या श्वानांकडून हल्ल्याबाबत तक्रार प्राप्त होत असून नगरपरिषद प्रशासनामार्फत सदर श्वानांना एन्टी रेबीज इंजेक्शन देण्यात येत आहेत असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.
खोपोली शहरात मागील काही महिन्यात कुत्र्यांमार्फत लहान मुलांवर हल्ले वाढले असून नगर परिषदेने शहरातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण करावे अशी मागणी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी केली आहे.