
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयमोटार वाहन निरीक्षकांचा माहे सप्टेंबरचा दौरा
रत्नागिरी, दि. 28 ) : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा माहे सप्टेंबर 2025 या कालावधीतील जिल्ह्यातील तालुका शिबीर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
तालुका शिबीर दौरा चिपळुण – 9, 16, 23, 30 सप्टेंबर, खेड – 4 आणि 18 सप्टेंबर, दापोली – 3 आणि 17 सप्टेंबर, मंडणगड – 10 सप्टेंबर, गुहागर – 11 सप्टेंबर, देवरुख – 24 सप्टेंबर, लांजा – 25 सप्टेंबर आणि राजापूर – 26 सप्टेंबर 2025
मोटार वाहन निरीक्षक हे जनतेच्या सोयीसाठी जिल्हा दौरा करतात. त्यावेळी शिबीर दौऱ्यांमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार कामे करण्यात येतील.