अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


रत्नागिरी, दि. २८ :- समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे मार्फत शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट होती. आता अर्ज करण्यास १ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यालयीन वेळ सायंकाळी ६.१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे. https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमुन्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास १ सप्टेंबर २०२५रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सादर करावीत. अधिक माहितीसाठी शासनाच्या संकेतस्थळ “www.maharashtra.gov.in” येथील “ताज्या घडामोडी” या लिंकवर भेट द्यावी. सन २०२५-२६ करीता या अगोदर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यानी पुन:श्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button