
संगमेश्वर तालुक्यात एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संगमेश्वर तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाला अटक
संगमेश्वर तालुक्यात एका तरुणीला लग्नाचे संगमेश्वर तालुक्यात एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संगमेश्वर तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाला देवरुख पोलिसांनी अटक आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संगमेश्वर तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपीने तिच्या मनाविरुद्ध तिचा गर्भपात केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेतील आरोपीचे नाव हरिदास शिवाजी बंडगर असून, तो मूळचा कवठेमहाकाळ (जि. सांगली) येथील रहिवासी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरिदास आणि पीडित तरुणी यांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर हरिदासने तरुणीला लग्नाचे वचन दिले.
लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. जेव्हा तरुणीने लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा हरिदासने तिला विश्वासात घेऊन एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केला. या घटनेनंतर तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने तात्काळ देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.