
प्राथमिक शाळांना गणपती सुट्टी ७ दिवसांची
राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या त्याचबरोबर खासगी प्राथमिक शाळांना सुट्ट्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी वर्षभरात ८४ सुट्ट्या शाळांना देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु आता त्यांची संख्या ७६ आणण्यात आली आहे. गणपतीची सुट्टी १० ऐवजी ७ दिवसांची देण्यात. येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शाळांच्या सुट्ट्यांविषयी सुधारित आदेश जारी केला आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्या संचालकांनी वर्षभरात शालेय कामकाजाचे दिवस २३७ असून एकूण सुट्ट्या १२८ दिवस घ्याव्यात असे नमूद केले आहे. यामध्ये रविवारच्या ५२ व अन्य ७६ सुट्ट्या असाव्यात असेही नमूद करण्यात आले आहे. संचालकांचा हा आदेश असताना जिल्हा परिषदेने यापूर्वी खासगी, प्राथमिक आणि जिल्हा परिषद शाळांसाठी सुट्ट्यांची यादी जाहीर करताना रविवारच्या ५२ आणि अन्य ८४ सुट्ट्यांची यादी जारी केली होती. संचालकांच्या आदेशाचा मुद्दा वरिष्ठ अधिकार्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सुधारित यादीचा प्रस्ताव मांडला.
www.konkantoday.com