
पुढील वर्षीचा गणेशोत्सव खड्डेमुक्त, उदय सामंत यांची ग्वाहीमुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे व्हिडीओ …
समाजमाध्यमावर दाखवून कोकणची बदनामी केली जात असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पुढील गणेशोत्सवापर्यंत जिल्हयाला खड्डेमुक्त महामार्ग मिळेल आणि महामार्गाच्या अपूर्ण कामाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा आढावा घेताना सामंत म्हणाले की, आता केवळ २१ किलोमीटरचे काम शिल्लक आहे. यात प्रामुख्याने पूल आणि त्यांच्या जोडरस्त्यांचा समावेश आहे. तसेच, फक्त साडेचार किलोमीटरच्या दोन्ही बाजूचा भाग अपूर्ण असून तोही लवकरच पूर्ण . पण गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची स्थिती आणखी बिघडली आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही रस्त्यांची दुरुस्ती वेगाने सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडीओमध्ये पावसाचे प्रमाण विचारात घेतले जात नाही, असेही त्यांनी नमूद केले.
सध्या महामार्गाची अपूर्ण कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे, गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आणि स्थानिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.www.konkantoday.com




