
ना. उदय सामंत ह्यांनी घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पुण्यातील सर्वश्रुत आणि भक्तिभावाचे केंद्र असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेतले. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांना गणरायाच्या प्रथम आरतीचा मान मिळाला.
यावेळी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, आपल्या शेतकरी बांधव बळीराजाला सुखी ठेव, तसेच महाराष्ट्राची अधिकाधिक सेवा आमच्या हातून घडावी, अशी प्रार्थना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी गणरायाच्या चरणी केली.