
गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत येणार्या चाकरमान्यांसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी ’सुविधा केंद्र’
गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत येणार्या चाकरमान्यांच्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता महामार्गावरून प्रवास सुरळीत व्हावा यात्साठी आता जिल्हा प्रशासनाने जबाबदारी उचलली आहे. गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर १६ सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. या सुविधा केंद्रावर पोलीस, महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित असणार आहेत. प्रवासात कोणतीही अडचण आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या जवळच्या सुविधा केंद्राची मदत घ्यावी असे आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सवादरम्यान मुंबई, पुणेहून कोकणात येणार्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाचा सण हा आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण साजरा केला जातो. या दरम्यान चाकरमानी कोकण रेल्वे तसेच एसटी बसचे आगाऊ आरक्षणही करतात. रेल्वेने अनेक गाड्या या मार्गावर सुरू केल्या आहेत या सर्व गाड्या फुल्ल झाल्या आहेत. सोबतच स्वतःचे वाहन घेवून कोकणात येणार्यार्यांची संख्याही तितकीच आहे. प्रत्येकाला वेळेत घरी पोहोचण्याची उत्सुकता असते. मात्र महामार्गावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे त्यांच्या मार्गात अडचणी येत आहेत अशावेळी महामार्गावर वाहतुकीची कोंडी होणे, प्रवाशांची गैरसोय होणे तसेच अपघात होण्यासारख्या घटना घडू नयेत, प्रवाशांना तातडीची मदत मिळावी यासाठी ही जिल्हा प्रशासनाकडून सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत.www.konkantoday.com