मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली


गेल्या अनेक वर्षापसून मराठा समाज आपल्या आपल्या मुलांसाठी आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे २७ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार होते.मुंबईकडे जाण्यासाठी मराठा बांधवांना आंदोलनात सामिल होण्याचं आवाहनही करण्यात आलं होत. अनेक वेळा चर्चा झाली, आंदोलनं झाली, परंतु ठोस निर्णय काही झाला नाही. आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, मराठा समाज सरसकट ओबीसी आरक्षण घेण्याच्या तयारीत आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला “चलो मुंबई” हा नारा देत आंदोलक मोहीम सुरू केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, २९ ऑगस्टला मुंबईत पोहोचण्यासाठी अंतरवालीपासून मार्गक्रमण सुरू होणार २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता अंतरवाली पासून निघून पैठण, शेवगाव, कल्याण फाटा, आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी) यांमार्गे २८ ऑगस्टला चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर असा मार्ग पाळून रात्री आझाद मैदानावर पोहचणार आहोत. तर २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आंदोलन आयोजित केले जाणार असंही जरंगे म्हणाले होते.

मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने आज (२६ ऑगस्ट) मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button