
जिओ ग्राहकांना धक्का! दररोज 1.5 जीबी डेटासह 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन रद्द
जिओने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. रिलायन्स जिओने आपला लोकप्रिय 799 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. हा प्लॅन ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताया प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस यासह 84 दिवसांची वैधता दिली जात होती. तसेच, जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडसारख्या ओटीटी सेवांचा मोफत सबस्क्रिप्शन देखील यामध्ये होता.
799 रुपयांचा हा प्लॅन जिओच्या मिड-रेंज कॅटेगरीत येत होता आणि अनेक महिन्यांपासून याची जोरदार मागणी होती. ग्राहकांना आता 666 रुपयांचा पॅक घेणे किंवा अधिक महागडा पर्याय निवडावा लागणार आहे, जे यूजर्ससाठी थोडे निराशाजनक ठरू शकते.
यापूर्वी जिओने 249 रुपयांचा बजेट-फ्रेंडली प्लॅन देखील बंद केला होता. त्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, 28 दिवसांची वैधता आणि दररोज 100 एसएमएस दिले जात होते, ज्यामुळे ग्राहकांना सुमारे 28 जीबी डेटा मिळायचा. आता 250 रुपयांपेक्षा कमी किमतीत कंपनी काही इतर प्लॅन ऑफर करत आहे.