
कोकणात मनसे रुजवणाऱ्या वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे यांच्यावर केलेली कारवाई दुर्दैवी : ॲड. बंटी वणजू
रत्नागिरी : कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) रुजवणाऱ्या वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर आणि संतोष नलावडे यांच्यावर केलेली कारवाई दुर्दैवी असून, कोणत्याही पक्षातील नेत्यांचे कान भरणाऱ्या टुकार मंडळीमुळे नेहेमीच चांगल्या जनसेवकांचे आणि पक्षाचेही नुकसान होते हे या वरून पुन्हा एकदा सिद्ध झाले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष अॅड. देवेंद्र सदानंद उर्फ बंटी वणजू यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, “कोणी नेत्यांच्या कानात जाऊन काहीही सांगत आणि प्रामाणिक जनसेवकाचे नेहेमीच नुकसान होते. नुसत्या अफवेने कारवाई होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणात मनसे रुजवणाऱ्या वैभवजी खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे यांच्यावर केलेली कारवाई दुर्दैवी होय. कोणत्याही पक्षातील नेत्यांचे कान भरणाऱ्या टुकार मंडळीमुळे नेहेमीच चांगल्या जनसेवकांचे आणि पक्षाचेही नुकसान होते हे या वरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.”
*जनतेसाठी कायमच रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे वैभव खेडेकर असतील, अविनाश सौंदळकर असतील किंवा संतोष नलावडे असतील, पक्षाचे प्रामाणिक काम करून पक्षात असे बक्षीस मिळत असेल तर नवीन कार्यकर्ता किंवा नेता पक्षाला कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित करत शेवटी काम करणारा कुणीकडेही गेला तरी काम थांबावत नाहीच. वैभव खेडेकर म्हणाले तसे फिनिक्स पक्षी राखेतून यशाला गवसणी घालतोच तशीच गवसणी वैभवजी खेडेकर आणि त्यांचे सहकारी घेतीलच या बद्दल तिळमात्र शंका नाही, असे अॅड. बंटी वणजू म्हणाले.