
आजपासून धावणार ५ गणपती स्पेशल
गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या पुणे-रत्नागिरी, एलटीटी-मडगाव वातानुकूलितसह एलटीटी-सावंतवाडी, मुंबई-ठोकूर, बडोदरा-रत्नागिरी गणपती स्पेशल २६ ऑगस्टपासून कोकण मार्गावर धावणार आहेत.
२७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. चाकरमानी गणपती स्पेशलमधून गावी डेरेदाखल होत आहेत. चाकरमान्यांच्या रेलचेलीने रेल्वेस्थानके पुरती गजबजलेली आहेत. ०११२९/०११३० क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी गणपती स्पेशल २६ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी धावेल. एलटीटीहून
सकाळी ८.४५ वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात रात्री ११ वा. सावंतवाडीहून सुटून दुसर्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटीला पोहचेल.
०११६५/०११६६ क्रमांकाची एलटीटी-मडगाव वातानुकूलित स्पेशल दर मंगळवारी एलटीटीहून रात्री १२.४५ वाजता सुटून दुसर्या दिवशी दुपारी २.३० वाजता मडगाव येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी ४.५० वाजता सुटून पहाटे ४.५० वाजता एलटीटीला पोहचेल. ०९११४/०९११३ क्रमांकाची वडोदरा-रत्नागिरी स्पेशल २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान मंगळवारी धावेल. वडोदरा येथून सकाळी ११.५० वाजता सुटून रात्री १२.३० वाजता रत्नागिरी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी येथून सुटून सायंकाळी ७.३० वाजता वडोदरा येथे पोहचेल.
०९०११/०९०१२ क्रमांकाची मुंबई-ठोकूर मंगळवारपासून सकाळी १२ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठोकूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात ठोकूर येथून सकाळी ११ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता मुंबई येथे पोहचेल. वसई मार्गे धावणार्या स्पेशलमुळे पश्चिम उपनगरातून गावी येणार्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com