
रत्नागिरी शहरातील श्री देव भैरी देवस्थान येथील तृण बिंदू केश्वरावरील संतत धार सांगता कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी शहरातील श्री देव भैरी देवस्थान येथील तृण बिंदू केश्वरावरील संतत धाराची सांगता काल झाली श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे श्रावण मासारंभला संततधार कार्यक्रमाला सुरुवात होते संपूर्ण श्रावण महिन्यात व समाप्तीपर्यंत रात्रंदिवस 24 तास ही संततधार तृणबिंदूकेश्वरावर मंत्रघोषात सुरू असते यावेळी ब्राह्मण पुजाऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात या संततधार भक्तीमय कार्यक्रमाची समाप्ती भाद्रपद मासारंभ म्हणजे काल झाली यावेळी भक्तिमय वातावरण झाले होते