
वीज ग्राहकांकडे ३५ कोटींची थकबाकी
जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी महावितरणला मोठा धक्का दिला आहे. तब्बल १ लाख २२ हजार ७७ ग्राहकांकडे ३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही थकबाकी वसूल करणे, हे महावितरणसमोरचे मोठे आव्हान आहे. थकबाकी केवळ सामान्य ग्राहकांकडेच नाही, तर सरकारी आणि इतर विभागांकडेही मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात आहे. या विभागात ५६ हजार ५४८ ग्राहकांकडे १६ कोटी ४८ लाख रुपये थकित आहेत. या पाठोपाठ खेड विभागातील ३४ हजार ८६१ ग्राहकांकडे १० कोटी ५८ लाख, तर चिपळूण विभागात ३० हजार ६६८ ग्राहकांकडे ८ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोठ्या थकबाकीमुळे महावितरण आर्थिक संकटात सापडले असून याचा थेट परिणाम भविष्यात वीजपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण
आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. यात वीज पुरवठा खंडित करणे आणि कायदेशीर कारवाई करणे, असे उपाय योजले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदार ग्राहकांनी आपली थकित बिले त्वरित भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.www.konkantoday.com