रत्नागिरी जिल्ह्याचा महाराष्ट्रात अभिमानास्पद ठसा महाराष्ट्रातील भव्य व उत्कृष्ट राखी प्रधान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ वर्षा ढेकणे यांचा विशेष सन्मान

दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे भव्य राखी प्रधान सोहळा उत्साहात व दणक्यात पार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ या सोहळ्याला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रभर झाले. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कोकण ठाणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला तर संपूर्ण राज्यातील ८० संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये तिसरा क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.

हा मान मिळवण्यात रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा संघटनेचा पूर्ण जिल्ह्यामध्ये राखी संकलनाचे काम जोमात झाले, त्यात रत्नागिरी शहराने विक्रमी संख्येने राख्या जमा करून आघाडी घेतली. तसेच अकरा मंडळातूनही चांगले संकलन झाले

या यशाचे सर्व श्रेय जिल्ह्यातील प्रत्येक मंडल अध्यक्ष सर्व बुथ प्रमुख व जिल्हा महिला मोर्चाच्या बळकट संघटनेला जाते. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण सहभाग नोंदवला. या प्रसंगी नुपूर मुळ्ये श्रुती ताम्हणकर शीतल रानडे प्रभावती कानडे अश्विनी वरवडेकर रसिका देवळेकर अनिता राजे शिर्के जया केतकर प्रियल जोशी शितल दिंडे वैष्णवी चव्हाण स्नेहा चव्हाण धृवी लाकडे सारिका भावे सुचिता ढेकणे श्रद्धा इंदुलकर रूपाली कदम पल्लवी पाटील सुप्रिया रसाळ संपदा तळेकर भक्ती दळी रेणुका गुंडये यांसारख्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या तसेच या सर्वांनी जिल्ह्यात खूप मेहनत घेतली

कार्यक्रमात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. तर प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांनी महिलांचे योगदान हेच खरी संघटनेची ताकद आहे महिलांच्या कार्यातूनच संघटना बळकट होत असते असे गौरवोद्गार काढले.महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी या प्रसंगी महिला सक्षमीकरणाबाबत थोडक्यात पण प्रभावी शब्दांत मार्गदर्शन करत म्हटले
महिला उभी राहिली तर समाज उभा राहतो.
रत्नागिरी जिल्ह्याने महाराष्ट्रात मिळवलेला हा मान संपूर्ण रत्नागिरीसाठी अभिमानाची बाब आहे. ही ताकद आणि उत्साहच पुढच्या प्रवासात आपल्याला नवी ऊर्जा देणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची प्रचंड उपस्थिती, जोशपूर्ण वातावरण आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमानास्पद ठसा यामुळे हा राखी प्रधान सोहळा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्यक्रम म्हणून नोंदला गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button