
परीक्षेतील कमी गुण पडल्याने आईने हटकले म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना..
परीक्षेतील कमी गुण मिळाल्याने आईने हटकले म्हणून एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी शहराजवळील उद्यमनगरमध्ये भागात घडली आहे. रेहान अस्लम कापडी (वय १५) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे, जो कॉन्व्हेन्ट शाळेत १० वी अ मध्ये शिकत होता.
युनिट टेस्टमध्ये रेहानला कमी गुण मिळाले होते. यावरून त्याच्या आईने त्याच्या पुढील शिक्षणाची आणि भविष्याची चिंता व्यक्त करत त्याला समजावले. आईच्या या शब्दांनी रेहानच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्याने स्वतःला घरातल्या खोलीत कोंडून घेतले आणि पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवले.
रेहानच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या वडिलांचा व्यवसाय सी-मॅन असून त्याला दोन बहिणी आहेत.