
चिपळूण शहरातील मार्कंडी येथील अतिक्रमणावर नगरपरिषदेची कारवाई
चिपळूण शहरातील मार्कंडी येथील प्रभात रोडलगत सार्वजनिक रस्त्यावर लोखंडी गेट घालून केलेल्या अतिक्रमणावर नगरपरिषदेने गुरुवारी कारवाई केली. यामुळे आता रस्त्याचे पुढील काम करणे सोयीचे होणार आहे.
नगरपरिषदेच्या शहर विकास आराखड्यात प्रभात रोडपासून नारायण तलावाकडे जाण्यासाठी चार मीटर रुंदीचा रस्ता नियोजित करण्यात आला आहे. नारायण तलावाचे काम पूर्ण झाल्याने आता या रस्त्याकडे चिपळूण नगरपरिषदेने लक्ष दिले आहे. त्यानुसार रस्त्यात असलेले अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना या रस्त्याच्या मार्गातच एकाने लोखंडी गेट तसेच तारेचे कुंपण घातले होते. त्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. यामुळे त्यांना नगरपरिषदेने पत्र देऊन अतिक्रमण हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही त्यांनी ते न काढल्याने अखेर अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी कारवाईचा बडगा उगारत हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. ही कारवाई मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आली.www.konkantoday.com