
चिपळूण येथील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
भारतीय जनता पक्ष आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव यांना दिली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण देखील उपस्थित होते.
या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यादव यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. १९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसातही दिमाखदार पद्धतीने झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. ‘‘संपूर्ण पक्ष आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भाजपच्या माध्यमातून आपल्याला कोकणात चांगले काम उभे करायचे आहे,’’ अशा सदिच्छा देऊन त्यांनी यादव यांना नव्या प्रवासासाठी प्रोत्साहन दिले.




