
गणेशोत्सवात महामार्गावर ९०० पोलीस
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला असून पोलीस यंत्रणा आतापासूनच सतर्क झाली आहे. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी गणेशोत्सव कालावधीत महामार्गावरील पळस्पे फाट्यापासून सिंधुदुर्गपर्यंत ९०० पोलीस कर्मचारी २४ तास तैनात राहणार आहेत. महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी चाकरमान्यांसाठी सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. नियोजनासाठी गणेशभक्त गावी डेरेदाखल होत आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांची रेलचेल सुरू झाली आहे.www.konkantoday.com