
शासनाने बंदी घालूनही मुंबई गोवा महामार्गावर आज अवजड वाहनांची वाहतूक सुरूच, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आता कोकणात येत आहेत त्यामुळे बंद केला अडथळा होऊ नये म्हणून शासनाने आजपासून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घातली होती तसेच जाहीर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात या मार्गावर आजही ट्रक पासून कंटेनर अशी अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत ही अवजड वाहतूक सुरू होती खेड जवळील भोसते घाटात देखील अवजड वाहतूक करणारे कंटेनर व ट्रक दिसत होते मात्र बंदी असूनही वाहतूक सुरू असताना पोलीस किंवा अन्य यंत्रणांकडून कोणताही प्रतिबंध केला जात नव्हता त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे शासनाने अवजड वाहतुकी बंदीचा काढलेलाआदेश कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे




