
रत्नागिरी तालुक्यातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायतची इमारत गळकी
रत्नागिरी तालुक्यात असलेल्या ग्रामपंचायती मधील सर्वात श्रीमंत मानली जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायतच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे पावसाळ्यात या इमारतीच्या छताच्या स्लॅबमधून पाणी गळत असल्याचे दृश्य दिसत आहे शिरगाव ग्रामपंचायत ही तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत मानली जाते कारण या ग्रामपंचायतच्या क्षेत्रात कारखाने, शहरा जवळच्या नव्या निवासी वसाहती फिनोलेक्स कंपनीचे रेस्ट हाऊस व निवासस्थाने, काही औद्योगिक वसाहती येतात त्यामुळे या ग्रामपंचायतीचे कराचे उत्पन्न मोठे आहे त्यामुळे ही ग्रामपंचायत श्रीमंत ग्रामपंचायत मानली जाते मात्र या श्रीमंत ग्रामपंचायतीचे इमारतीची अवस्था नाजूक आहे इमारतीच्या छता मधून पाणी गळत असल्याने त्या ठिकाणी इमारतीत पाणी गळत असल्याने ती जागा निरुपयोगी ठरली आहे याचा त्रास ग्रामपंचायतीत कामा करिता येणाऱ्या अनेक ग्रामस्थांसह कर्मचाऱ्यांना होत आहे त्यामुळे या इमारतीची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवण्यात यावी अशी मागणी होत आहे