
’बेस्ट’ निवडणुकीत ’ठाकरे ब्रँड’च्या भ्रमाचा भोपळा फुटला, शिवसेना नेते रामदास कदम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रॉंची शिवसेना कॉंग्रेसच्या दावणीला बांधत गहाण ठेवणार्या उद्धव ठाकरे यांचा ठाकरे नव्हे तर ’कॉंग्रेस बँड’ असल्याची खोचक टीका करत ’बेस्ट’ निवडणुकीत ’ठाकरे ब्रँड’च्या भ्रमाचा भोपळा फुटल्यामुळेच राज ठाकरे नियोजनाचा विकास आराखडा घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले, असा टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी लगावला.
’बेस्ट’च्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीची खिल्ली उडवली. गेल्या २५ वर्षात विकासाच्या नियोजनाचा आराखडा दिसला नाही का, आताच का आठवण झाली, या आणि अशा प्रश्नांचा भडीमारही केला. मराठी माणूस आपल्या सोबत राहिलेला नाही, याची जाणीव झाल्यामुळेच आता महानगरपालिका निवडणुकीतही ’भोपळा’ मिळेल, या भीतीपोटीच विकासाचा नियोजन आराखडा मुख्यमंत्र्यांना देवून सिद्धच करून दाखवले, असा टोलाही लगावला.www.konkantoday.com