
प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी चिपळुणातील पूर नियंत्रणावर सुचविले उपाय
गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पुरस्थितीचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पूरनियंत्रणाचे ठोस उपाय सुचवले आहेत. कोळकेवाडी धरणासह कामथे, मोरवणे व अडरे धरणांच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवणे, शहरातील काही ठिकाणी संरक्षण भिंती उभारणे, वाशिष्ठी नदीतील बेटे काढणे, नाले सफाई आणि विशेष म्हणजे प्लास्टिक कचर्यावर नियंत्रण ठेवले, तर चिपळूण शहराला मोठ्या प्रमाणावर पुराचा धोका कमी करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पूरस्थितीत प्रशासनाचा प्रभावी समन्वय कोळकेवाडी परिसरात फक्त पाच दिवसात तब्बल १,००० मि.मी. पाऊस झाला. चिपळूणमध्ये फक्त ३६ तासात ३०० मि.मी. पर्जन्यवृष्टी झाली. मंगळवारी पाणी शहरात घुसले तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोठे नुकसान टाळले. धरण प्रशासन, महाजनको, पोलीस, लघुपाटबंधारे, कृषि विभाग यांच्या उत्तम समन्वयामुळे पाण्याचा निचरा लवकर झाला. धरण व्यवस्थापन पूरनियंत्रणाची किल्ली कोळकेवाडी धरणातून थेट पाणी सोडले जात नाही; वीजनिर्मितीनंतरचे अवजलच वाशिष्ठीत जाते. पाऊस व भरती-ओहोटीचा ताळमेळ साधून टर्बाइनद्वारे वीजनिर्मितीचे नियोजन केल्यास पाण्याची पातळी समतोल राहाते. त्यामुळे अवजल सोडण्याची वेळ योग्यरितीने बदलता आली आणि पुराचे पाणी नियंत्रणात ठेवता आले. कोयना धरणाचे पाणी चिपळूण परिसरात कधीच येत नाही, हा गैरसमज नागरिकांनी दर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com




