
शेअर्समधून फायद्याचे आमिष दाखवून चिपळुणातील महिलेची १५ लाखांची फसवणूक
चिपळूण येथील यशोधन नगर कापसाळ येथे राहणार्या फिर्यादी महिलेला शेअर्समधून अधिक फायद्याचे आमिष दाखवून तिची १५ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून याबाबत आरोपी अनहिता मेहता व भरत गाला या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघा आरोपींनी फिर्यादी महिलेकडून शेअर्स व आयपीओकरिता तसेच विविध टॅक्सकरिता १४.४.२०२५ ते २२.५.२०२५ या कालावधीत १६ लाख १९ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले त्यातील ४६ हजार रुपये फिर्यादी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा केले मात्र उर्वरित १५ लाख ९६ हजार रुपये व फायद्याची रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली म्हणून सदर फिर्यादी महिलेने चिपळूण स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com