
लांजा तालुक्यातील वाघ्रट-वाडीलिंबू ग्रामपंचायतीत बाटली आडवी करून घेतला दारूबंदीचा निर्णय
लांजा तालुक्यातील वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीने गावात दारूंबदीचा ऐतिहासिक ठराव मंजूर करून आदर्शवत पाऊल उचलले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यात तसेच जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लांजा तालुक्यात पोलिसांनी धाडी टाकून अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसाय उघड केला होता. त्यामुळे तालुक्यात दारू धंदे वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, यावर केवळ पोलिसांच्या कारवाईवर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वतः पुढाकार घेवून आपली जबाबदारी दाखवून दिली. वाघ्रट-वाडीलिंबू ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव एकमुखाने मंजूर केला आहे.
www.konkantoday.com




