
रत्नागिरी फिल्म सोसायटीतर्फे शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ. सविता नायक मोहिते यांच्याशी संवाद
कलात्मक व आशयघन चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकांचे जनक आणि दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. वेगळे विषय हाताळून, मानवी स्वभावाचे कंगोरे उलगडून दाखविण्यात त्यांचा हातखंडा होता. अश्या या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वावर आजपर्यंत फक्त हिंदी व इंग्रजी भाषेत लिखाण उपलब्ध होते. प्रथमच मराठीत श्यामबाबूंवर अभ्यासपूर्ण लिखाण करून त्यांचा जीवनपट पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा मान डॉ. सविता नायक मोहिते यांना जातो. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच येत आहे.
रत्नागिरी फिल्म सोसायटीतर्फे शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल विवा, मारूती मंदिर, रत्नागिरी येथे , डॉ. सविता नायक मोहिते यांच्याशी संवाद साधून श्याम बेनेगल, त्यांचे चित्रपट व विचार प्रत्यक्षदर्शी अनुभवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी फिल्म सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
दिवस: शनिवार दिनांक २३ ऑगस्ट
वेळ: सायंकाळी ठीक 6.30
ठिकाण: विवा एक्झिक्युटीव्ह, मारुती मंदिर.