
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती गणपती तर ११६ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना होणार
कोकणवासीयांचा महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. घराघरात उत्साहाचे वातावरण आहे गणपतीसाठी लागणाऱ्या विविध सामानानी बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशोत्सवासाठी चाकरमानी हळूहळू जिल्ह्यात दाखल होत आहेत. बुधवारी प्रत्येक घरी बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ९८६ घरी तर ११६ सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती गणपती तर ११६ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामधील ११ हजार ९८४ दीड दीवसांचे गणपती आहेत.