
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला मात्र कोट्यावधी रुपयाचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरीतील नद्यांच्या पुराचे पाणी ओसरले आहे. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सुमारे ६ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून अजून पंचनाने सुरू असल्यामुळे काही दिवसात नेमके नुकसान किती झाले, हे स्पष्ट होणार आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. मागील दोन-तीन दिवस तर जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील प्रमुख आठ नद्यांपैकी सात नद्या या इशारा पातळीच्या वरती वाहत होत्या. खेड, चिपळूण, राजापूरसह संगमेश्वर तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. मागील दोन दिवस पुराचे पाणी शहर परिसरात घुसलेले होते. यातच जोरदार वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे, संरक्षक भिंती कोसाळणे, घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणलाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
पूरस्थिती व जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता; मात्र महावितरणच्या कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न करत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. चिपळूण, संगमेश्वर, मंडणगडमध्ये महावितरणच्या ग्राहकांना सर्वाधिक फटका बसला. संगमेश्वरमध्ये काही गावात जवळपास 22 तास वीजपुरवठा खंडित झाला होता. चिपळूमध्येही मंगळवार व बुधवारी वीजपुरवठा खंडित होता;




