
निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी वैद्यकीय उपचार योजना
रत्नागिरी, दि. 22 :- उच्च न्यायालय मुंबई यांनी निर्धन घटकातील रुग्णांना धर्मादाय न्यास संचलित धर्मादाय रुग्णालय/वैद्यकीय केंद्रात मोफत वैद्यकीय उपचार व दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता योजना मंजूर केलेली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धन वर्गातील लोकांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा मिळण्याच्या प्रयोजनार्थ निर्धन व्यक्तीच्या एकूण वार्षिक उत्पनाची मर्यादा 1 लाख 80 हजार रुपये व दुर्बल घटकातील व्यक्तीच्या एकूण वार्षिक उत्पनाची मर्यादा 3 लाख 60 हजार रुपये निर्दिष्ट केलेली आहे. योजनेची माहिती टोल फ्री क्र. १८००२२२२७० वर तसेच धर्मादाय कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या धर्मादाय रुग्णालय यादीमध्ये खेड तालुक्यातील बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल, लवेल या रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.