
देवरूख नजिकच्या पाटगाव येथे ब्लॅक पँथर मातेच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरे
देवरूख नजिकच्या पाटगाव येथे ब्लॅक पँथरच्या बछड्याला दोन दिवसापूर्वी वनविभागाने जीवदान देत अधिक उपचारासाठी सातारा येथे रवाना करण्यात आले आहे. या बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बछड्याला नेण्यासाठी मादी पुन्हा येण्याची शक्यता असल्याने पाटगाव परिसरात वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती वनपाल न्हानू गावडे यांनी दिली. यामध्ये काही हालचाली आढळून आल्यास पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे गावडे यांनी नमूद केले आहे.
www.konkantoday.com




