
दापोली तालुक्यातील दाभोळ येथील दोन नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
*दापोली तालुक्यातील दाभोळ येथील दोन नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला
या हल्ल्यात दोन व्यक्ती खंबीर जखमी झाल्या आहेत. फिरण्यासाठी बाहेर पडलेले बावा देसाई (६७) व योगेश यशवंत महामुणकर (४२) यांच्यावर काही कुत्र्यांनी एकत्रितपणे झडप घालून चावा घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यापूर्वी बालके सह अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.अशा सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी ग्रामपंचायतीवर उदासीनतेचा आरोप करत तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.




