
गोवा दारूविक्री विरोधात राजापूर पोलिसांनी घेतली धडक मोहीम हाती
राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू असून या विरोधात राजापूर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.
मागील पाच दिवसांमध्ये राजापूर पोलिसांनी गोवा बनावटीची अवैधरित्या दारू विक्री करणार्या सहा जणांवर कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांनी गोवा बनावटीच्या दारूविक्रीला आळा घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. त्यातच हॉटेल आणि बार मालकांनीही गोवा बनावटीची दारूविक्री बंद न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. मागील पाच दिवसात तालुक्याच्या विविध भागांमध्ये धाडी टाकत पोलिसांनी सहा जणांवर कारवाई केली आहे. कारवाईची ही मोहीम चालूच राहणार आहे.
www.konkantoday.com




