
अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल स्पर्धेत सेंट थॉमस स्कूलच्या मुलींच्या संघाला विजेतेपद
रत्नागिरी: सर्वंकष विद्यामंदिर रत्नागिरी येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल स्पर्धेमध्ये सेंट थॉमस स्कूलच्या १३ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले आहे.
अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल स्पर्धेमध्ये सेंट थॉमस स्कूलमधील १३ वर्षाखालील मुलींचा संघ पहिल्यांदाच सहभागी झाला होता. पहिल्याच सहभागामध्ये फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवून सेंट थॉमस स्कूलच्या मुलींच्या संघाने आपले नाव व शाळेचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले.
विजयी संघाला क्रीडाशिक्षक अजित धावडे, स्वप्नाली पवार, मार्गदर्शक प्रवीण आंबेरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सेंट थॉमस स्कूलचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.
फोटो ओळी: विजेत्या संघासोबत सेंट थॉमस स्कूलचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, क्रीडाशिक्षक अजित धावडे, स्वप्नाली पवार