अजिनाथ धामणे यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय दिशा समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या राज्यविकास समन्वय आणि निग्रहाने समित्या दिशा या केंद्र सरकारच्या सर्व महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्यातील दिशा समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील विविध विकास प्रकल्पांची अंमलबजावणी आणि देखरेख केली जाते. ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ बाबुराव धामणे यांनी महाराष्ट्रातील गाव पातळीवर सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांनी राज्यभर दौरे करून गाव पातळीवरील समस्या व कोणत्या शासन दरबारी मांडल्या आणि अनेक ठिकाणी त्यांचे निकारण घडवून आणले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने त्यांची महाराष्ट्र राज्य दिशा समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अजिनाथ धामणे यांनी गावांचा आणि शहराचा विकास हा देशाच्या प्रगतीचा पाया असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद केले. दिशा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी पारदर्शक आणि गतिमान होईल यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहील. या संधीबद्दल मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार शाहू महाराज आणि आमदार अनुराधा चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो, अशा भावना श्री. धामणे यांनी व्यक्त केल्या.

अजिनाथ धामणे यांच्या नियुक्तीबद्दल गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र आणि ग्रामसंवाद सरपंच असोशियन महाराष्ट्र राज्याचे कोकण विभाग अध्यक्ष ॲड. प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button