
NRHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचा पाठिंबा.. डॉ परशुराम निवेंडकर यांनी घेतली संपकरी कर्मचाऱ्यांची भेट
रत्नागिरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या बेमुदत संपाला जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. कंत्राटी पद्धतीवर अनेक वर्षे सेवा बजावत असूनदेखील कर्मचाऱ्यांना अद्याप कायम करण्यात आलेले नाही. त्यामुळे असंतोष निर्माण झाला असून तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर यांनी त्यांचे सहकाऱ्या सह संपकरी सहकाऱ्याची भेट घेतली आणि त्या वेळी सांगितले की, आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय्य असून शासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.




