मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती होण्याचा मान देवगडचे सुपुत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांना मिळाला

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील थेट नियुक्ती मिळून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती होण्याचा मान देवगडचे सुपुत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांना मिळालेला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अमित जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. अथक परिश्रम आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

अ‍ॅड. जामसंडेकर यांनी वकिली पेशामध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पडल्या असून प्रत्येक ठिकाणी मोलाचे योगदान दिले आहे. मुंबई येथून कायद्याची पदवी, इंग्लंड येथून पदव्युत्तर पदवी व इतर विशेष पदव्यांचे शिक्षण घेतलेले अमित जामसंडेकर गेल्या 28 वर्षांपासून नामांकित वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहेत. भारतातील काही नामांकित वकिलांमध्ये बौद्धिक संपदा व व्यापारी कायदे यांच्या विशेषतज्ज्ञमध्ये त्यांची गणना केली जाते. तसेच भारतातील काही मोजक्या वकीलांप्रमाणे तेही लंडन मधील 4-5 ग्रेज इन स़्केअर या जगप्रसिद्ध बॅरीस्टर चेंबरचे सदस्य आहेत. 1998 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली व 2001 साली ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंग्लंड अंड वेल्सचे सॉलिसिटर म्हणून काम पाहू लागले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यासाठीचे मुंबई उच्च न्यायालय, इतर उच्च न्यायालयमध्ये तसेच इंग्लंड, सिंगापूर, दूबई अशा देशांतील लवादापुढे वकील म्हणून कामकाज पाहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button