मालगुंड ग्रामस्थांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला बेबी वेट मशीन भेट

मालगुंड : गावाच्या आरोग्य सेवेची जाण ठेवत मालगुंड येथील ग्रामस्थ श्री बंटी साळवी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला बेबी वेट मशीन भेट दिले. आरोग्य केंद्रातील नवजात शिशूंच्या तपासणी व देखभालीसाठी हे बेबीवेट मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आरोग्य केंद्रात दररोज मोठ्या संख्येने गर्भवती महिला व लहान बालकांची तपासणी केली जाते. बालकांचे अचूक वजन घेणे ही तपासणी प्रक्रियेत महत्त्वाची बाब असते. यासाठी बेबी वेट मशीनची आवश्यकता होती. ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही गरज पूर्ण करत आरोग्य सेवेला थेट हातभार लावला आहे.

या उपक्रमामुळे बालकांच्या आरोग्य तपासणीला गती मिळून उपचार अधिक परिणामकारक होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल पणकुटे व डॉ सुनीता पवार आरोग्य सहाय्य्क परशुराम निवेंडकर तसेच आरोग्य कर्मचारी यांनी सांगितले. त्यांनी ग्रामस्थांच्या या सामाजिक बांधिलकीचे मनःपूर्वक कौतुक करत आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button