
पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला… गणेश चतुर्थीनिमित्त ‘Fly91’च्या उड्डाण संख्येत वाढ
संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी रंगात असताना फ्लाय९१ या विमान सेवा कंपनीने पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावरील उड्डाण संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे.पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावर २४, २९, ३१ ऑगस्ट आणि ५ व ७ सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणे ठेवण्यात आली आहेत. या उड्डाणांची तिकिटे आता विमानकंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशी माहिती कंपनीच्या अधिकरांनी दिली आहे.गणेशोत्सव हा आमच्या ग्राहकांसाठी खास काळ आहे, जेव्हा अनेक जण कुटुंबीयांसोबत प्रवास करतात. पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावरील अतिरिक्त उड्डाणांमुळे आम्ही प्रवाशांना अधिक सोय, लवचिकता आणि विश्वासार्ह ‘लास्ट माइल’ कनेक्टिव्हिटी देत आहोत.” असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानवोज चाको यांनी सांगितले.




