
‘नृत्यार्पण’ च्या ११ शिष्यांनी कोरले यशाचे शिखर
गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांना 'नृत्याविष्कार' आणि 'नृत्यविभूषण' पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या पॅरिस, फ्रांस येथील आंतरराष्ट्रीय नृत्य परिषदेशी संलग्नअसलेल्या अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघाच्या १८ व्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या शिष्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या अप्रतिम कामगिरीबद्दल गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांना ‘नृत्याविष्कार’ आणि ‘नृत्यविभूषण’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
मायनर गट:
- चौथे स्थान: देवेशी पांढोळे, मुंबई
- तिसरे स्थान: ओवी साळवी, पनवेल
- तिसरे स्थान: मीरा झगडे, रत्नागिरी
ज्युनियर गट: - तिसरे स्थान: अनन्या डांगे, जर्मनी
- दुसरे स्थान: शुभ्रा आंब्रे, कोतापूर
- चौथे स्थान: धनश्री पवार, पनवेल
- पहिले स्थान: ओजस्वी बामणे, टिटवाळा
- तिसरे स्थान: सानवी नरवणे, पावस
ओपन गट: - चौथे स्थान: कृतिका जोशी, मुंबई
- पहिले स्थान: श्रुती किल्लेकर, करंजाडी
- दुसरे स्थान: पल्लवी राठोड, रत्नागिरी
सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्यांच्या यशात मोलाची भर घातली. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.