निधन वार्ता


कै.नंदकुमार भार्गव साळवी सर आदर्श कलाशिक्षक, रांगोळीकार,कलातपस्वी यांचे रत्नागिरी येथे दि.१९ ऑगस्ट२०२५ मंगळवारी सायंकाळी ८ वाजता दु: खद निधन झाले.
सन १९९४ साली बृहन्मुंबई कलाध्यापक संघाची स्थापना करणाऱ्या मुंबईतील अनेक शाळेतील कलाशिक्षकांं पैकी कै.नंदकुमार साळवीसर होते.सन १९९४ साली शिरोडकर हायस्कूलचे कलामहर्षी स्व.नाबरसर, तसेच आर एम भट हायस्कूलचे स्व. परबसर व चिकित्सक हायस्कूलचे स्व. चंद्रकांत जोशीसर,तसेच साधना विद्यालयचे स्व. वैद्यसर, अंजूमन हायस्कूलचे श्री. दिपक देसाईसर, श्री. दत्ता राउळसर, श्री. शितोळे सर ,श्री हिरामण पाटीलसर, स्व.पवारसर, स्व. चितारी सर अशा अनेक कलाशिक्षक मंडळींनी एकत्रीत येवून बृहन्मुंबई कलाध्यापक संघाची स्थापना केली. आणि त्यानंतर अनेक वर्षे कै.नंदकुमार साळवी सर यांनी बृहन्मुंबई कलाध्यापक संघाचे सचिव म्हणून कार्य केले. श्री नंदकुमार साळवी उरण येथे रहात होते. मुंबईतील कै.साळवी सर मारवाडी विद्यालयात कलाशिक्षक म्हणून ३५ वर्षे सेवेत कार्यरत होते. त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी त्याचे एके काळचे सहकारी माजी आमदार श्री रामदास फुटाणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button