
रत्नागिरीत २४ ऑगस्टला ब्रह्माकुमारींच्या महारक्तदान अभियानांतर्गत शिबिर
रत्नागिरी :
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे देशभरात महारक्तदान अभियान राबविण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात रत्नागिरी, खेड आणि दापोली येथे रक्तदान शिबिरे होणार आहेत.
रत्नागिरीमध्ये हे शिबिर रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत भरविण्यात येणार आहे. या शिबिराची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी दोन अशी असेल.
या महाअभियानाशी जोडण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे, असे आवाहन ब्रह्माकुमारींच्या संचालिका शारदा बहनजी यांनी केले आहे.




