
युवकांना सामाजिक क्षेत्रात कार्यरत करण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चां अभिनव उपक्रम
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अविरतपणे सेवा करणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ने आता युवकांना सामाजिक क्षेत्रात कार्यरत करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी मधील राज्यशास्त्र व हिंदी शाखेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना समुदाय सहभाग कार्यक्रम अंतर्गत दि १८ ऑगस्ट ते दि २३ ऑगस्ट अखेर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार विद्यार्थ्यांनी समुदाय सहभाग कार्यक्रम हा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आणि अनिवार्य असून या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजपयोगी कार्यात सहभागी होणे अपेक्षित आहे.त्यानुसार महाविद्यालयाने संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ची निवड करून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक 18 ऑगस्ट पासून झाला.यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी चे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.निलेश पाटील व हिंदी विभागाचे समन्वयक, मार्गदर्शक प्रा.कृष्णात खांडेकर तसेच एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जमीर खलफे, सचिव युसुफ शिरगावकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर उपस्थित होते.या उपक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी घ्या कला शाखा उपप्राचार्या प्रा. डॉ.कल्पना आठल्ये यांचे सहकार्य लाभले आहे.
या विद्यार्थ्यांना संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेचे कार्य तसेच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील येणा-या रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना सहकार्य कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणात १७ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
अशा प्रकारच्या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी केले आहे.