
खेड तालुक्यातील सवेणी येथील अपघातात जखमी झालेल्या इसमाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू
खेड तालुक्यातील सवेणी येथील
खेड तालुक्यातील सवेणी येथील नितीन सुरेश गुजर (वय ४३) या दुचाकीस्वाराचा मोटारीला पाठीमागून धडक दिल्याने मृत्यू झाला. सवेणी सिमेचीवाडी येथील नितीन गुजर १२ जुलैला सवेणी येथे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांनी पुढे जाणाऱ्या मोटारीला धडक दिली.
अपघातानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांना कराड येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथून त्यांना कांदिवलीतील रुग्णालयात नेले; मात्र ६ ऑगस्टला दुपारी दीड वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.