
आंजर्ले-अडखळ खाडीत उभी असलेली ‘विघ्नहर्ता’ ही मासेमारी नौका समुद्रात कलंडून मोठे नुकसान
दापोली तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळसदृश्य परिस्थितीमुळे आंजर्ले-अडखळ खाडीत उभी असलेली ‘विघ्नहर्ता’ ही मासेमारी नौका दि. १८ दुपारी बुडाली.
या घटनेत नौका मालक किसन लक्ष्मण कुलाबकर (रा. हर्णे) यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.
‘विघ्नहर्ता’ (IND-MH-4-MM-482) ही नौका खाडीत उभी असताना पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. जोरदार प्रवाहामुळे नौका कलंडली, फुटली आणि आत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे