अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणेकागदपत्रासह अर्ज सादर करा


रत्नागिरी, दि. 20 : “अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे” या योजनेत 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येतो. तरी अर्जदाराने विहीत नमुना प्राप्त करुन घेवून अटींची पूर्तता करणारे पुरावे / कागदपत्रासह अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.
स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. त्याचप्रमाणे स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. ३.५० लाख (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र) इतकी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के (कमाल रु.३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. बचत गटाचे राष्टर्टीकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे आणि हे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे. पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाने उद्दिष्ट निश्चित नुसार पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्थसहाय्य मंजूर करुन त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button