
महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे रत्नागिरीकरांना जाहीर आवाहन !
मी, उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की रत्नागिरी व परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर आहे.
👉 नागरिकांनी सतर्क राहावे व विनाकारण घराबाहेर पडू नये.
👉 केवळ अत्यावश्यक कारणास्तवच घराबाहेर पडावे.
👉 प्रशासन, पोलीस यंत्रणा, महानगरपालिका व आपत्कालीन सेवा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
👉 सेवाभावी संस्था देखील मदतीसाठी तत्पर आहेत.
रत्नागिरीच्या संस्कृतीनुसार आपण सर्वांनी एकत्र राहून या कठीण परिस्थितीचा सामना करूया.
पाऊस पूर्ण थांबेपर्यंत सुरक्षित राहा, प्रशासनास सहकार्य करा.
आपला,
उदय सामंत
पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा