
मनसे खेडतर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात
मनसे श्री"चा मानकरी ओंकार सुर्वे*, तर "मनसे युवा"चा मानकरी ठरला आदित्य आरेकर


खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व राजवैभव प्रतिष्ठान, खेड आयोजित व बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी यांच्या मान्यतेने खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहिहंडी उत्सवानिमित्त शरीर सौष्ठव स्पर्धा युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये संपन्न झाली.

या स्पर्धेत ओंकार सुर्वे (स्टॅलियन जिम, खेड) याने “मनसे श्री”चा किताब पटकावला, तर आदित्य आरेकर (लाईफ स्टाईल फिटनेस, दापोली) हा “मनसे युवा”चा मानकरी ठरला. बेस्ट पोझरचा किताब रोशन लोखंडे (न्यू गोल्ड जिम, मंडणगड) याला देण्यात आला.
या शरीर सौष्ठव स्पर्धेत पंच म्हणून इरफान काद्री, महेश वादक, सूरज पाटणे, बंधू भुरण, सदानंद बारटक्के, राज कारेकर यांनी उपस्थिती लावली.




