चिपळुणातील निवृत्त शिक्षिका खुनातील दुसरा आरोपी अखेर सापडला; कर्नाटकमधून उचलले

चिपळूण :
धामणवणे–खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला ट्रॅव्हल एजंट जयेश भालांद्र गोंधळेकर याचा साथीदार रवी शंकर कांबळे (रा. सातारा) खुनानंतर गायब झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक सातारा येथे गेले होते, मात्र तो पूर्णपणे सावध असल्याने सापडला नव्हता. अखेर चाणाक्ष तपासानंतर चिपळूण पोलिसांनी कर्नाटक राज्यातून त्याला अटक केली.

दरम्यान, अटकेत असलेल्या जयेश गोंधळेकरची कोठडी सोमवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता आणखी चार दिवसांची कोठडी मिळाली.

धामणवणे-खोतवाडी येथील ६३ वर्षीय निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा हातपाय बांधून निर्घृण खून झाला होता. चौकशीत जयेश गोंधळेकरने दागिने व पैशांच्या हव्यासापोटी हा खून केल्याची कबुली दिली. या कटात त्याचा साथीदार रवी कांबळेही सामील असल्याचे उघड झाले. मात्र खुनानंतर तो फरार झाला होता. मोबाईल बंद करून तो पोलिसांच्या नजरेआड राहिला होता.

रवीच्या मोबाईलचा दोन-चार महिन्यांपूर्वीचा सीडीआर तपासला असता तो कर्नाटकात असल्याचे आढळले. यावरून पोलिस पथक गुलबर्गा जिल्ह्यातील अलमेल या गावात गेले. तेथे चौकशीत त्याची पत्नी व मेव्हणे यांनी त्याला याच गावात लपवून ठेवल्याचे मान्य केले. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी रवी कांबळेला पकडले. तब्बल ११ दिवसांच्या फरारीनंतर तो पोलिसांच्या हाती लागला.

गुन्हे पकड पथकाचे कौशल्य
रवीला पकडणे हे मोठे आव्हान होते. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, हेडकॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, कॉन्स्टेबल किरण केदार आदींच्या पथकाने कर्नाटकात सलग तीन दिवस-रात्र मेहनत घेऊन त्याला जेरबंद केले.

कोठडीचा निर्णय
कर्नाटकातून अटक केलेल्या रवी कांबळेला रविवारी न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर जयेश गोंधळेकरलाही सोमवारी न्यायालयात हजर केले असता आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button